किल्ल्यांची गोडी आणि इतिहासाची ओढ – गणेशोत्सव २०२५ विशेष उपक्रम

नमस्कार..!

जय शिवराय..! जय शंभुराजे..! जय जिजाऊ..!

दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ निमित्त प्रतिष्ठानतर्फे विविध सोसायट्या आणि मंडळांमध्ये ऐतिहासिक प्रश्नमंजुषा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये समर्थ स्वरूप सोसायटी, श्रेयस गार्डन सोसायटी, मोहन नगर मित्र मंडळ आणि विंडसर काउंटी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मंडळांच्या चिमुकल्यांनी दाखवलेला उत्साह पाहून मनात एक विचार निर्माण झाला – आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये गडकिल्ल्यांबद्दल कुतूहल आणि संवर्धनाची ओढ नक्कीच आहे; फक्त गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि यातून उपक्रमाची योजना यशस्वी होण्याची खात्री आली या उपक्रमात प्रतिष्ठानचे अनेक मावळे सहभागी झाले होते. खूप उत्साहात हा उपक्रम पार पडला आणि शेवटी सर्व मंडळांनी प्रतिष्ठानसोबत भविष्यातील संवर्धन कार्यात सहभागी होण्याची ग्वाही दिली. अशा कार्यक्रमांमुळे इतिहास आणि संवर्धनाविषयीची जागृती निश्चितच वाढेल, असा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *