गडझुंजार मावळे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य

।। शिवरायांचे विचार हेच आमचे भांडवल ।।

ll शिवरायांचे विचार हेच आमचे भांडवल ll

गडझुंजार मावळे प्रतिष्ठान गेले कित्येक वर्ष सातत्याने गडसंवर्धन, सामाजिक उपक्रम तसेच सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे.

‘शिवरायांचे विचार हेच आमचे भांडवल‘ हे ब्रीद वाक्य उरात ठेऊन गडझुंजार मावळे प्रतिष्ठान आपले कार्य करत आहे. छ. शिवाजी महाराजांनी ज्या गडकाेटांच्या आधारावर हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या गडकाेटांची काय अवस्था आहे हे आज आपण सर्व जन पाहत आहे. पुढील भावी पिढीला छ. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर हे गडकाेट जपणे गरजेचे आहे. हे गडकाेट आपले आहेत व त्यांचे जतन आपल्यालाच करायला हवे हे प्रत्येकाच्या मनात जागृत करणे गरजेचे आहे हे उद्दिष्ठ डाेळ्यासमाेर ठेऊन प्रतिष्ठान अनेक गडकाेटावर संवर्धनाचे कार्य करत आहे.

प्रतिष्ठान गडसंवर्धनासाेबतच सामाजिक कार्यातही कार्यरत आहे. आपण या समाजात राहताे आणि म्हणूनच आपण या समाजाचे काही तरी देण लागताे या उद्देशाने प्रतिष्ठान मार्फत अनेक सामाजिक उपक्रम घेतले जातात. या उपक्रमांतर्गत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना त्यांच्या मुलभूत गरजा पुरवण्याचे काम केले जाते.